पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

परदेशातील नोकरी न मिळाल्याने अभियंत्याकडून आईची हत्या करून आत्महत्या

घटनास्थळाचे छायाचित्र (एएनआय)

परदेशात ज्या नोकरीचे आश्वासन देण्यात आले होते. ती न मिळाल्यामुळे मुंबईत माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंत्याने स्वतःच्या आईला विष पाजून मारले आणि नंतर स्वतः आत्महत्या केली, अशी माहिती पुढे आली आहे. वेंकटेश्वर अय्यर असे या अभियंत्याचे नाव आहे. त्यांच्या आईचे नाव मीनाक्षी असून, त्या ७५ वर्षांच्या होत्या. पोलिसांना अभियंत्याच्या लॅपटॉपमध्ये एक पत्र मिळाले. त्यामध्ये त्याने आत्महत्येमागचे कारण लिहिले आहे. 

दादरः भाजी घेण्यावरुन वाद, विक्रेत्याकडून ग्राहकाचा खून

मुंबईत मीरा रोडमधील एका इमारतीमध्ये सातव्या मजल्यावर हे कुटुंब राहात होते. गेल्या शुक्रवारी वेंकटेश्वर याने आपल्या आईला विष पाजून मारले आणि नंतर आत्महत्या केली. घरातून दुर्गंधी येऊ लागल्यावर शेजारच्या लोकांनी पोलिसांना बोलावले. त्यावेळी या सगळ्या प्रकाराचा उलगडा झाला. लॅपटॉपवर मिळालेल्या पत्रामध्ये वेंकटेश्वर याने या प्रकारासाठी कोणालाही दोषी ठरविलेले नाही. 

वेंकटेश्वर आणि त्याची आई या घरामध्ये भाड्याने राहात होती. एप्रिल महिन्यातच त्यांचा भाडेकरार संपुष्टात आला होता. पण वेंकटेश्वर याने घरमालकाकडे आणखी तीन महिने राहण्याची परवानगी मागितली होती. मला परदेशात एका मोठ्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली असल्याचे त्याने घरमालकाला सांगितले होते.

ईव्हीएममध्ये घोळ आढळला नाही तर मिशी काढेनः उदयनराजे

वेंकटेश्वर अय्यर हा मुंबईतच एका कंपनीमध्ये काम करीत होता. काही महिन्यांपूर्वीच त्याची नोकरी गेली होती. त्यामुळे तो आर्थिक अडचणीत सापडला होता. गेल्या तीन महिन्यांपासून त्याने घराचे भाडेही भरले नव्हते, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर ढोम्बे यांनी सांगितले. पोलिसांनी वेंकटेश्वर अय्यर याच्या केरळमधील नातेवाईकांना याची माहिती कळवली. त्यानंतर सोमवारी त्यांनी या दोघांचे मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी ताब्यात घेतले.