पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इक्बाल मिर्चीचा सहकारी हुमायूं मर्चंटला ईडीने केली अटक

महिलेसमोर अश्लिल कृत्य करणाऱ्याला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा निकटवर्तीय असलेल्या गँगस्टर  इक्बाल मिर्चीच्या सहकाऱ्याला ईडीने मंगळवारी अटक केली. वरळीतील सीजे हाऊस मालमत्ता गैरव्यवहारप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. हुमायूं मर्चंट याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे इक्बाल मिर्चीचे अधिकारपत्र आहे. हुमायूंला दुपारी १ वाजता मुंबईतील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

... म्हणून प्रियांका गांधींनी महाराष्ट्रात प्रचार केला नाही

माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल आणि इक्बाल मिर्ची यांच्यामध्ये झालेल्या वरळी येथील सीजे हाऊस खरेदी व्यवहार प्रकरणाची चौकशी ईडी करत आहे. याप्रकरणी ईडीने शुक्रवारी मिर्चीचे कुटुंबिय आणि प्रफुल्ल पटेल यांची चौकशी केली. १२ तासांपेक्षा जास्त काळ चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान प्रफुल्ल पटेल यांनी मिर्चीच्या कुटुंबियांसोबत मालमत्ता खरेदी व्यवहार केला असल्याचे मान्य केले असल्याचे ईडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. 

मुसळधार पावसानंतर नळदुर्ग किल्ल्यातील नर-मादी धबधबा वाहू लागला

प्रफुल्ल पटेल यांचे सीजे हाऊसमध्ये दोन फ्लॅट आहेत. हे फ्लॅट गँगस्टर इक्बाल मिर्ची याच्या मालकिचे असून ते प्रफुल्ल पटेल यांनी विकत घेतल्याचा संशय या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना आहे. २००७ मध्ये इक्बाल मिर्ची आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये सीजे हाऊसमधील या फ्लॅटच्यासंबंधी विकास करार झाल्याची माहिती समोर आली आहे. इकबाल मिर्ची हा दाऊद इब्राहिमचा हस्तक होता. 

INX मीडिया प्रकरणात चिदंबरम यांना जामीन, पण तूर्त सुटका नाही