पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INX मीडिया प्रकरण: सीबीआय करणार इंद्राणी मुखर्जीची चौकशी

इंद्राणी मुखर्जी

आयएनएक्स मीडिया प्रकरणी सीबीआय मंगळवारी तुरुंगात असलेल्या इंद्राणी मुखर्जीची चौकशी करणार आहे. इंद्राणी मुखर्जी सध्या भायखळा तुरुंगात आहे. सीबीआय आज भायखळा तरुंगात जाऊन आयएनएक्स मीडियाची माजी संचालक इंद्राणी मुखर्जीची चौकशी करणार आहे. सीबीआयने दाखल केलेली याचिका स्विकारत सोमवारी न्यायालयाने इंद्राणीची चौकशी करण्यासाठी परवानगी दिली होती.

सरकार आपले डोळे कधी उघडणार?, प्रियांका गांधींचा मार्मिक प्रश्न

सीबीआयने न्यायालायाला सांगितले की, भ्रष्टाचार प्रकरणात पैशांची देवाण-घेवाण केल्या प्रकरणी इंद्राणी मुखर्जीची चौकशी करणार आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणामध्ये माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अटक करण्यात आली आहे. इंद्राणी मुखर्जीने पी. चिदंबरम आणि त्याचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्याविरोधात जबाब नोंदवला होता. तर या प्रकरणी अटकेत असलेले माजी अर्थमंत्री पी. चिदंबर यांना १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

गडचिरोलीत पूर ओसरला; महामार्ग अद्याप बंद

दरम्यान, ४ जुलै रोजी दिल्लीतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने इंद्राणी मुखर्जीला आयएनएक्स मीडिया प्रकरणात सरकारी साक्षीदार बनण्याची परवानगी दिली होती. आयएनएक्स मीडिया प्रकरण हे २००७ चे आहे. या कंपनीचे संचालक शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जी आणि तिचे पती पीटर मुखर्जी आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणात ही हे दोघे आरोपी आहेत. 

चांद्रयान २ : विक्रम लँडरसंदर्भात इस्रोने जारी केली नवी माहिती