भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार आहे. कारण अत्याधुनिक पाणबुडी 'आयएनएस खांदेरी' शनिवारी नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आयएनएस खांदेरी या पाणबुड्यांचा लोकार्पण सोहळा पार पडला. मुंबईतल्या माझगाव डॉक येथे हा लोकार्पण सोहळा झाला.
Mumbai: Defence Minister Rajnath Singh commissions the second Kalvari-class Submarine INS 'Khanderi.' pic.twitter.com/tDJh6kCFuX
— ANI (@ANI) September 28, 2019
Mumbai: Defence Minister Rajnath Singh arrives for commissioning ceremony of the second Kalvari-class Submarine INS Khanderi. pic.twitter.com/mbnSTZbRk1
— ANI (@ANI) September 28, 2019
३०० किलोमीटरवरील जहाज नष्ट करु शकते
'सायलंट किलर' म्हणून ओळखली जाणारी आयएनएस खांदेरी पाण्यामध्ये शत्रूंवर सर्वात आधी हल्ला करणारी कलवरी श्रेणीतील दुसरी अत्याधुनिक पाणबुडी आहे. नौदलाच्या ताफ्यामध्ये खांदेरी दाखल झाल्यामुळे आता समुद्री मार्गे शत्रू भारतावर हल्ला करण्याचा विचार सुध्दा करणार नाहीत. ३०० किलोमीटर लांब असलेल्या शत्रूंचे जहाज नष्ट करण्याची क्षमता आयएनएस खांदेरीमध्ये आहे.
४५ दिवस पाण्यात राहू शकते
आयएनएस खांदेरी पाणबुडी भारतीय सागरी सीमा सुरक्षेसाठी पूर्णपणे सक्षम आहे. खांदेरी पानबुडी पाण्यामध्ये तब्बल ४५ दिवस राहू शकते. तर ही पानबुडी एका तासामध्ये ३५ किलो मीटरचा प्रवास करु शकते. ६७ मीटर लांब, ६.२ मीटर रुंद आणि १२.३ मीटर उंचीच्या या पानबुडीचे वजन १,५५० टन आहे. यामध्ये ३६ पेक्षा जास्त नौसैनिक राहू शकतात. तसंच ही पाणबुडी समुद्रात ३०० मीटर खोल जाऊ शकते. कोणत्याही प्रकारचा रडार या पाणबुडीचा शोध लावू शकत नाही.
१२ हजार किलोमीटर प्रवास करु शकते
आयएनएस खांदेरी बॅटरीवर चालणारी पाणबुडी आहे. जास्त काळ पाण्यामध्ये राहण्यासाठी यामध्ये ७५० किलोची ३६० बॅटरी लावण्यात आली आहे. बॅटरीला चार्ज करण्यासाठी यामध्ये १,२५० वॉट्सचे २ डिझल जनरेटर देखील लावण्यात आले आहे. पाण्यामध्ये एकदा उतरल्यानंतर खांदेरी १२ हजार किलोमीटरपर्यंतचा प्रवास करु शकते.
जगातील सायलंट किलर पाणबुडी
रेडार, सोनार, इंजीनसह यामध्ये छोटे-मोठे १००० पेक्षा जास्त उपकरण आहेत. याव्यतिरिक्त सुध्दा न आवाज करता ही पाणबुडी पाण्यामध्ये चालू शकते. त्यामुळे ती जगातील शांत पाणबुड्यांमधील एक आहे. तसंच रडार सहजपणे तिचा शोधू घेऊ शकत नाही. म्हणूनच या पाणबुडीला 'सायलंट किलर' असे देखील म्हटले जाते.
खांदेरी नाव कसे दिले?
भारतीय नौदलाची ताकद वाढवणाऱ्या पाणबुडीचे नाव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या खांदेरी किल्ल्याच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो समुद्राच्या मध्यभागी आहे. किल्ल्याच्या चारही बाजूने पाणी आहे