पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... आणि इंडिगोच्या विमानाने मुंबई विमानतळावर केले इमर्जन्सी लँडिंग

इंडिगो विमान

इंडिगोचे चंदीगढ ते मुंबई प्रवास करणाऱ्या विमानाचे शुक्रवारी संध्याकाळी मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानाच्या इंजिनामध्ये बिघाड असल्याचे वैमानिकाला जाणवल्याने तातडीने विमान विमानतळावर उतरविण्यात आले. एअरबस कंपनीचे ३२० निओ जातीचे हे विमान होते.

'जैसी करनी, वैसी भरनी';पवारांच्या गृहकलाहावर उद्धव यांचे मार्मिक भाष्य

विमान कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार हे विमान प्राधान्यक्रमाने विमानतळावर उतरविण्यात आले. या स्वरुपाच्या लँडिंगमध्ये वैमानिक हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून त्यांना तातडीने लँडिंगसाठी विनंती करतो. यानंतर या विमानाला इतर विमानापेक्षा आधी लँडिंगची संधी दिली जाते. पण मुंबई विमानतळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार हे इमर्जन्सी लँडिंगच होते. 

नोकरी गेल्याने इंजिनिअरने कुटुंबियांना संपवून केली आत्महत्या

विमानामध्ये एकूण १४४ प्रवासी होते. शुक्रवारी दुपारी ४.४४ वाजता हे विमान मुंबई विमानतळावर उतरविण्यात आले. दरम्यान, इंजिनमधील बिघाडाबद्दल वेळीच योग्य माहिती न दिल्यामुळे नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने तीन वैमानिकांसह दोन अभियंत्यांना निलंबित केले आहे. १५ ते १८ एप्रिल या काळात इंडिगोच्या विमानाचे ऑडिट करण्यात आल्यानंतर ही माहिती पुढे आली होती.