पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... म्हणून प्रवाशांसह इंडिगोचे विमान सात तास धावपट्टीवर अडकले

इंडिगो कंपनीचे विमान

मुंबईतील मुसळधार पाऊस आणि शहरात विविध ठिकाणी साचलेले पाणी याचा फटका बुधवारी विमान वाहतुकीलाही बसला. मुंबईहून नवी दिल्लीला निघालेले इंडिगो कंपनीचे विमान तब्बल सात तास उड्डाणाच्या तयारीत धावपट्टीवर अडकून पडले होते. या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या रागाला वाट मोकळी करून दिली. विमान धावपट्टीवर थांबले असताना आपल्याला कर्मचाऱ्यांकडून आवश्यक मदत दिली गेली नाही, असा आरोप प्रवाशांनी केला.

इंडिगोचे ६ई-६०९७ हे विमान मुंबईहून बुधवारी दुपारी ३.१५ मिनिटांनी निघून दिल्लीला ५.३० वाजता पोहोचणे अपेक्षित होते. पण पावसामुळे हे विमान मुंबईहून बुधवारी रात्री ९.५५ वाजता उडाले.

ऑक्टोबरपासून कर्जे आणखी स्वस्त, रिझर्व्ह बँकांचा महत्त्वपूर्ण निर्णय

एका प्रवाशाने केलेल्या ट्विटनुसार, गेल्या सहा तासांपासून इंडिगोच्या ६ई-६०९७ या विमानाला काय झालंय माहिती नाही. दर अर्धा तासानी विमानाच्या उड्डाणाची वेळ बदलली जाते आहे. आम्ही विमानात बसलो आहोत. पण वैमानिकाकडून उड्डाणासाठी वेळ असल्याचे सांगितले जाते आहे.

दुसऱ्या एका प्रवाशाने केलेल्या ट्विटनुसार इंडिगोचे ६ई-६०९७ विमानाला काय झालंय? प्रवाशांना विमानात बंद करून ठेवलंय. अशा स्वरुपाच्या विमान कंपनीचा परवानाच रद्द केला पाहिजे.

Teachers Day 2019 :: गुगलची डुडलद्वारे गुरु वंदना

इंडिगोने या संदर्भात जारी केलेल्या निवेदनानुसार, मुंबईतील मुसळधार पावसामुळे आणि अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे तसेच वाहतूक कोंडी झाल्यामुळे आमच्या कंपनीचे कर्मचारी वेळेत विमानतळावर पोहोचू शकले नाहीत. मुंबईमध्ये या काळात ३० विमाने उड्डाण करू न शकल्याने जमिनीवरच होती. आम्ही अडकलेल्या प्रवाशांसाठी सर्व प्रकारची मदत करीत आहोत.