पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रसिद्ध संगीतकार खय्याम काळाच्या पडद्याआड

संगीतकार खय्याम

प्रसिद्ध संगीतकार मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी यांच सोमवारी वयाच्या ९२ वर्षी निधन झाले. मुंबईतील सुजय हॉस्पिटलमध्ये रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लंग इंफेक्शनमुळे त्रस्त असलेल्या खय्याम यांच्यावर २८ जूनपासून  रुग्णालयात उपचार सुरु होते. या रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली. 

१८ फेब्रुवारी १९२७ मध्ये पंजाबमध्ये जन्मलेल्या  मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी यांना 'खय्याम' या नावाने ओळखले जायचे. लहानपणापासूनच त्यांना शिक्षणाऐवजी संगीतात रस होता. मोहम्मद चिश्ती, पं. हुस्नलाल भगतराम आणि त्यांचे बंधू पं. अमरनाथ यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतले.

त्यानंतर त्यांनी गायक म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. १९५३ मध्ये त्यांनी पहिल्यांदा ‘फुटपाथ’ चित्रपटासाठी संगीतकार म्हणून काम केलं होतं. खय्याम यांची गाणी सहज ओळखून येतात. त्यांचे कोणतेही गाणे हे संतूर, सतार, बासरीवर अलवारपणे वाजणाऱ्या विशिष्ट ढंगाच्या 'इंट्रो' म्युझिकने उत्तम वातावरणनिर्मिती करणारे आहे. ज्या स्वरांवर पहिली ओळ संपते त्याच स्वरांवर पुढची ओळ सुरू होते. हे त्यांच्या गाण्यातील आणखी एक वैशिष्ट होते. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Indian music director and background score composer Mohammed Zahur Khayyam pass away In Mumbai