पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकमधून भारतात आलेल्या २३ नागरिकांना देशाचे नागरिकत्व

मंत्रालय

पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या अल्पसंख्याक समाजातील २३ नागरिकांना सोमवारी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर व गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले.

भास्कर जाधवही शिवसेनेत, शुक्रवारी औपचारिक प्रवेश

पूर्वीपासून पाकिस्तानात राहिलेल्या व आता भारतात स्थलांतरित झालेल्या अल्पसंख्याक समाजातील नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्याचे अधिकार केंद्र सरकारने राज्य सरकारला प्रदान केले आहेत. या निर्णयानुसार जळगाव, औरंगाबाद, अमरावती व कोल्हापूर जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या २३ नागरिकांना मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी माजी आमदार गुरुमुख जगवानी, उपसचिव व्यंकटेश भट, उपसचिव युवराज अजेटराव आदी उपस्थित होते.

..म्हणून काँग्रेससोबत आता आघाडी नाहीः प्रकाश आंबेडकर

गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानात असलेल्या आणि आता भारतात वास्तव्यास आलेल्या नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्याची मागणी होत होती. ही मागणी यानिमित्ताने पूर्ण होत असल्याचा आनंद आहे, अशी भावना केसरकर व पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.