पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबई महानगरपालिकेच्या ३७ ठेकेदारांवर आयकर विभागाचे छापे

मुंबई महानगर पालिका

राज्यामध्ये सत्ता स्थापनेचा पेच न सुटल्यामुळे राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू केली. त्यानंतर राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरु आहेत. अशातच आयकर विभागाने मुंबई महानगरपालिकेच्या खासगी ठेकेदारांवर मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. आयकर विभागाने पालिकेच्या ३७ बड्या खासगी ठेकेदारांच्या कार्यालयावर छापे टाकले आहेत. या छाप्यातून तब्बल ७३५ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे.

'शिवसेनेचा मुख्यमंत्री २५ वर्षे राहिल, पण मी पुन्हा येईन म्हणणार नाही'

आयकर विभागाने मुंबई आणि सुरत याठिकाणी ३७ ठिकाणी छापे टाकले. या कारवाई दरम्यान आयकर विभागाने ७३५ कोटींच्या बोगस नोंदी आणि खर्चाच्या बनावट पावत्या जप्त केल्या आहेत. दरम्यान, संबंधित ठेकेदारांच्या चौकश्या सुरु आहेत. या छाप्यामुळे आर्थिक गैरव्यवहाराला सहकार्य करणाऱ्या कंपन्या आणि वित्तीय संस्थांची नावं देखील पुढे येणार आहेत.  

नव्या आघाडीत मुख्यमंत्री शिवसेनेचाच यावर शिक्कामोर्तब

आयकर विभागाच्या एका अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरपीएस इन्फ्रा, वनवर्ल्ड टेक्सटाइल ग्रुप आणि स्काय वे-रेलकॉल इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपन्यांची कार्यालय आणि संबंधित प्रमुखांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला. याप्रकरणाशी संबंधित असलेल्या सर्वांची चौकशी केली जाणार आहे. यामध्ये शिवसेनेच्या नेत्यांचा देखील समावेश असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

'बायको घरात नाही, स्वयंपाक करायला येते का?'