पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

येत्या काळात भाजपच राज्यात सरकार बनवेल - देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतीय जनता पक्ष कोणतेही फोडाफोडीचे राजकारण न करता राज्यात येत्या काळात सरकार तयार करेल, असा विश्वास मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दुपारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केले.

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार; उद्धव ठाकरे ठाम

देवेंद्र फडणवीस म्हणाले, गेल्या काही दिवसांत काही लोक आमच्यावर चुकीचे आरोप करीत आहेत. भाजप कधीही फोडाफोडीचे राजकारण करीत नाही. महाराष्ट्रातही फोडाफोडीचे राजकारण करून आम्ही सरकार स्थापन करणार नाही. येत्या काळात महाराष्ट्रात पुन्हा एकदा आमचेच सरकार येईल, असा मला विश्वास आहे. पण त्यासाठी फोडाफोडीचे राजकारण कोणत्याही स्थितीत आम्ही करणार नाही, अशी ग्वाही मी तुम्हाला देतो, असे त्यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

राज्यपालांनी मला पुढील व्यवस्था होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्यास सांगितले आहे. पुढील व्यवस्था काय असेल, मला आता माहिती नाही. राष्ट्रपती राजवट येईल की दुसरा कोणता पक्ष सत्ता स्थापन करेल, हे आम्हाला माहिती नाही. पण राज्यपाल सांगेपर्यंत मी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहिन. या काळात कोणतेही धोरणात्मक निर्णय आम्ही घेऊ शकणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.