पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नातेवाईकाकडूनच अभिनेत्रीची बदनामी, बनावट खाते काढून अश्लील चॅटिंग

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबईस्थित एका अभिनेत्रीचा लैंगिक छळ आणि बदनामी केल्याच्या आरोपावरून तिचाच नातेवाईक असलेल्या तरूणाविरुद्ध मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संबंधित तरुणाने अभिनेत्रीचे एका फोटो शेअरिंग ऍपवर बनावट खाते काढले होते. तिथे तो तिच्या नावाने समोरच्या पुरुषांशी अश्लील भाषेत चॅटिंग करायचा. एका मित्राकडून याची माहिती मिळाल्यावर अभिनेत्रीने याविरोधात सांताक्रुझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४० वर्षांची अभिनेत्री ११ जून रोजी त्यांच्याकडे आली आणि तिने एक तक्रार दाखल केली. आपला एक नातेवाईक तरुण आपली बदनामी करीत असल्याचे तिने म्हटले आहे. आरोपी तरुण असून तो अभियंता असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. 

अभिनेत्रीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, तिला एक दिवस तिच्या मित्राचा फोन आला. त्याने तिला तिच्या नावाने सुरू असलेल्या या सगळ्या प्रकाराबद्दल माहिती दिली. आरोपी समोरच्या पुरुषांशी बोलताना त्यांना दोन मोबाईल नंबर देत असल्याचे त्याने तिला सांगितले. तिने नंबर बघितल्यावर लक्षात आले की यापैकी एक तिचाच जुना नंबर असून, तो वापरणे तिने बंद केले आहे. तर दुसरा नंबर तिच्या एका लांबच्या नातेवाईकाचा आहे. 

कंत्राटी लोक कंपनीचे नियमित कर्मचारी नाहीत - सुप्रीम कोर्ट

आरोपी तरुणाने काही महिन्यांपूर्वी या अभिनेत्रीकडे तिचे काही फोटो मागितले होते. तुला काम मिळवून देतो, असे सांगत त्याने हे फोटो मागितल्यामुळे तिने त्याला फोटो दिले होते. हेच फोटो त्याने त्या ऍपवर अपलोड केले होते. यानंतर अभिनेत्रीने आरोपी तरुणाला फोन केला आणि त्याला या सगळ्या प्रकाराबद्दल विचारले. त्याने आपणच हे सगळे प्रकार केले असल्याचे मान्य केले आणि चूक झाल्याचे तिला सांगितले. 

यानंतर संबंधित अभिनेत्रीने सांताक्रुझ पोलिसांकडे या सगळ्या प्रकाराबद्दल तक्रार नोंदविली. पोलिस पुढील तपास करीत आहेत.