पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इक्बाल मिर्चीबरोबरील जमीन व्यवहार कायदेशीरः प्रफुल्ल पटेल

प्रफुल्ल पटेल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या कुटुंबीयांचे आणि 'मिर्ची' नावाने कुख्यात असलेल्या इक्बाल मेमनच्या आर्थिक व्यवहारावर स्पष्टीकरण दिले आहे इक्बाल मिर्ची हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा सहकारी होता. ज्या इक्बाल मेमनबरोबरील जमिनीच्या व्यवहारावरुन आरोप करण्यात येत आहे, तो पूर्णपणे कायदेशीर होता, असे ते म्हणाले. त्यांनी संपूर्ण जमिनीचा इतिहास सांगितला. वादग्रस्त जमीन १९९० ला मुंबई उच्च न्यायालयाच्या निगरानी खाली एक व्यक्ती एम के मोहम्मदकडून हजरा इक्बाल मेमनला विकण्यात आली होती. त्यानंतर माझ्या कुटुंबात काही वाद झाले आणि त्यानंतर इक्बाल मेमन बरोबर २००४ मध्ये जमिनीवरुन व्यवहार झाला. हा सर्व व्यवहार रजिस्ट्रारच्या समोर झाला. सर्व दस्तऐवज जिल्हाधिकाऱ्यांसमोर समोर ठेवण्यात आले. जर इक्बाल मेमन गुन्हेगार असता तर, त्याचवेळी प्रशासनाने हा व्यवहार रोखला असता.

मंगळवारी ईडीने या जमीन व्यवहारप्रकरणी प्रफुल्ल पटेल यांना समन्स पाठवले असून त्यांना १८ ऑक्टोबर रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. ते म्हणाले, माध्यमांत सध्या काय सुरु आहे. याबाबत मी काही बोलू इच्छित नाही. कारण मला अजून पूर्ण तथ्यांची माहिती नाही. एका अहवालातील काही भागावरुन माध्यमांत बातम्या दाखवल्या जात आहेत. प्रत्येकाला आपल्या हिशोबाने त्याचा अर्थ काढण्याचा अधिकार आहे. मी निवडणूक प्रचारात होतो. पण माध्यमांत येत असलेल्या बातम्यांवरुन मला स्पष्टीकरण देण्यासाठी प्रचार अर्धवट सोडून यावे लागले, असे ते म्हणाले. 

ईडी तिहारमध्ये उद्या चिदंबरम यांची चौकशी करणार, अटकेचीही शक्यता

तर, दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांच्या मते त्यांना कोणतीही नोटीस किंवा समन्स मिळाली नसल्याचे म्हटले आहे. जर मला अशी काही नोटीस आली तर मी स्वतः ईडीकडे जाईल. ईडीकडे उपलब्ध असलेल्या दस्ताऐवजावरुन प्रफुल्ल पटेल आणि त्यांची पत्नी वर्षा यांच्याकडून चालवली जाणारी कंपनी मिलेनियम डेव्हलेपर्सने इक्बाल मिर्चीच्या जागेवर १५ मजली इमारत उभारली आहे.

मुख्यमंत्री झोपेत सुद्धा माझे नाव घेत असतील : शरद पवार