पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईत शालेय बससाठी लवकरच खास सुविधा, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार

शालेय बस

बेस्ट बसेस, टॅक्सी यांना ज्या पद्धतीने प्रवाशांना घेण्यासाठी खास थांबा दिलेला असतो. त्याच पद्धतीने आता मुंबईत शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेससाठी खास थांबा दिला जाणार आहे. या थांब्यांची निर्मिती केल्यानंतर पालकांना आपल्या पाल्याला याच ठिकाणी बसमध्ये बसवावे लागेल आणि त्याच ठिकाणाहून बसमधून उतरून घ्यावे लागेल. मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणाने अशा स्वरुपाचे २०० बसथांबे उभारण्याला मंजुरी दिली आहे. 

नेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी येणार Apple TV+

मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) आता मुंबईत असे थांबे कुठे उभारता येतील, यासाठी जागेची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. हे सर्व बसथांबे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सुरक्षित स्थळी असतील. त्याचबरोबर बसमध्ये चढण्यासाठी गडबडीच्या वेळी विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्याची गरज पडणार नाही, याचीही काळजी घेतली जावी, असे निर्देश वाहतूक प्राधिकरणाने आरटीओला दिले आहेत.

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी खास बसथांबे उभारले जावेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले होते. महाराष्ट्र मोटार वाहतूक नियम २०११ नुसार अधिकाऱ्यांना आधी शाळेच्या व्यवस्थापनाशी चर्चा करावी लागणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित स्थान कोणते आहे, हे निश्चित करण्यात शाळेचे व्यवस्थापन मदत करणार आहे. 

पाकिस्तानात पेट्रोल- डिझेलपेक्षा दूध महाग, १४० रुपये प्रति लिटर

मोटार वाहन विभागाचे प्रवक्ते आणि अंधेरी आरटीओतील प्रादेशिक परिवहन अधिकारी अभय देशपांडे म्हणाले, पालक, शाळेचे व्यवस्थापन आणि बस चालक त्यांची मते आरटीओकडे पाठवू शकतात. त्यावर आम्ही सकारात्मकपणे नक्की विचार करू.

जागा निश्चित झाल्यानंतर आरटीओचे अधिकारी त्याची यादी स्थानिक प्रशासन आणि वाहतूक पोलिसांकडे देतील. त्यानंतर या ठिकाणी आवश्यक आकाशचिन्ह आणि फलक लावले जातील. दरम्यान, अशा स्वरुपाच्या जागा निश्चित करण्यात काही अडचणी आहेत. वेगवेगळ्या शाळेच्या बस वेगवेगळ्या मार्गाने जात असतात. त्यामुळे एकच थांबा सर्व बससाठी निवडणे व्यवहारदृष्ट्या अवघड आहे.