पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

या रेल्वे मार्गावर सर्वाधिक बळी, २०१९ मध्ये १,७६३ प्रवासी मृत्युमुखी

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाते, मात्र याच लाईफलाईनवर दरदिवशी ७ लोक मृत्युमुखी पडतात अशी माहिती समोर आली आहे. सरकारी रेल्वे पोलिसांनी २०१९ या वर्षांतील रेल्वे अपघातात बळी पडलेल्या प्रवाशांची एकूण आकडेवारी जाहीर केली. जीआरपीच्या आकडेवारीनुसार २०१९ मध्ये रेल्वे मार्गावर एकूण २ हजार ६९१ जणांचे मृत्यू झाले तर ३ हजार १९४ प्रवासी जखमी झाले. 

गर्भपातासाठीच्या कालावधीत वाढ, सुधारित विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी

यातील सर्वाधिक बळी हे मध्य रेल्वेवर गेले आहेत. मध्य रेल्वेवरील अपघातात २०१९ या वर्षांत सर्वाधिक म्हणजे १, ७६३ प्रवाशांचा मृत्यू झाला. मध्य रेल्वेवरील सर्वाधिक मृत्यू हे कल्याण आणि कुर्ला स्थानकात  झाले. कल्याण स्थानकात ३३१ तर कुर्ला  स्थानकात २०१९ मध्ये २९४ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. 

जेडीयू नेत्याने प्रशांत किशोर यांची तुलना केली 'कोरोना विषाणू'शी

 तर पश्चिम रेल्वेवर ९२८ प्रवासी मृत्यूमुखी पडले. २, ६९१  मृत्यूमुखी प्रवाशांपैकी १, ४५५ प्रवाशांचा मृत्यू हा रेल्वेरुळ ओलांडाना झाला आहे. लक्ष वेधण्यासारखी बाब म्हणजे २, ६९१ मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांमध्ये महिलांची संख्यादेखील अधिक आहे. २०१९ या वर्षांत रेल्वे अपघातात एकूण ३०८ महिलांनी जीव गमावला आहे.