पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सीबीटीसी प्रणालीमुळे तिन्ही मार्गावर लोकलच्या फेऱ्या वाढणार

मुंबई लोकल

कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल सिस्टममुळे (सीबीटीसी) लवकरच लोकलच्या फेऱ्या वाढणार आहेत. ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना लोकलनं प्रवास करताना त्रासाला समोर जावं लागतं. यावर उपाय म्हणून मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गावर लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहे. कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल सिस्टम(CBTC)चा वापर करून हार्बर, मध्य आणि पश्चिम मार्गावर लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. 

रिक्षा, टॅक्सींवरील जाहिरातींसाठी लवकरच एक नियमावली

 सीबीटीसी प्रणालीमुळे गर्दीच्या वेळी लोकलच्या फेऱ्या या १६ वरून २४ होणार आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशननं उपनगरीय मार्गावर या अत्याधुनिक डिजिटलाइज्ड सिग्नल यंत्रणेच्या तांत्रिक बाबींच्या अंमलबजावणीस  सुरुवात केली आहे. लोकलच्या तिन्ही मार्गावर ही सीबीटीसी प्रणाली पूर्णपणे कार्यरत होण्यासाठी ४ वर्षांचा अवधी लागणार आहे. 

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का; धनराज महालेंची घरवापसी

 सीबीटीसी प्रणालीमुळे  नियंत्रण कक्षाकडून सिग्नलद्वारे झटपट सूचना मोटरमनला मिळतील. यामुळे लोकल वेळेत धावतील. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स ते कल्याणदरम्यान ही प्रणाली वापरण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठीचा खर्च हा २१६६ कोटी असणार आहे. तर हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स ते  पनवेलपर्यंत ही प्रणाली वापरण्यात येणार आहे याचा खर्च जवळपास १३९१ कोटी असणार आहे. तर पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरार मार्गावर या प्रणालीचा वापर केला जाणार आहे.