पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ईव्हीएममध्ये घोळ आढळला नाही तर मिशी काढेनः उदयनराजे

उदयनराजे भोसले

सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर नाराजी व्यक्त करत मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी केली आहे. माझ्या मतदारसंघात मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी. त्याचा काय जो खर्च असेल तो मी करण्यास तयार आहे. मतपत्रिकेद्वारे होणारे मतदान आणि ईव्हीएमच्या माध्यमातून होणारे मतदान यामध्ये खूप फरक जाणवेल. जर तुम्हाला असा फरक जाणवला नाही तर मी मिशा व भूवया काढेन, असे आव्हान त्यांनी दिले. 

..नाहीतर रामराजेंची जीभ हासडली असतीः उदयनराजे

ते मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. सातारा लोकसभा मतदारसंघात अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएमवरील मतदानाची नोंद आणि झालेल्या एकूण मतदानात मोठी तफावत दिसून आली आहे. जनतेतला संभ्रम दूर करणे आणि लोकशाहीवरचा विश्वास जिवंत ठेवण्यासाठी आयोगाने मतपत्रिकेद्वारे लोकसभेचे पुन्हा मतदान घेतले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. 

उदयनराजेंना आवरा, नाही तर पक्षातून बाहेर पडू, रामराजेंचा इशारा

मी जे मत मांडले, ते पक्षाचा खासदार म्हणून नाही, तर देशाचा नागरिक म्हणून मांडले आहे. अमेरिकेत मतदानासाठी ईव्हीएम वापरत नाही. मग भारत अमेरिकेपेक्षा पुढे आहे का? असा खोचक सवालही त्यांनी केला.

 

 

 

'जातीऐवजी आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सर्वांनाच आरक्षण मिळावे'