पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हिम्मत असेल तर पुन्हा निवडणूक लावा, आता फडणवीसांचे ठाकरेंना आव्हान

देवेंद्र फडणवीस

उद्धव ठाकरे म्हणतात की, त्यांनी बाळासाहेबांना शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचे वचन दिले होते. पण उद्धवजींनी खरं सांगाव त्यांनी बाळासाहेबांना ते काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणार असल्याचे सांगितले होते का, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुक्ताईनगर येथे बोलताना उद्धव ठाकरेंनी सरकार पाडून दाखवण्याचे आव्हान दिले होते. पण मीच त्यांना आव्हान देतो की, हिम्मत असेल तर त्यांनी आता निवडणूक घेऊन दाखवावीच. तुम्ही तिघे एकत्र या आम्ही एकट्याने तुम्हाला तोंड देऊ. हिम्मत असेल तर पुन्हा जनतेच्या कोर्टात जाऊ, असे फडणवीस यांनी म्हटले.

सेनेनं सर्व तत्वं गुंडाळून मातोश्रीच्या कोपऱ्यात ठेवली:चंद्रकांत पाटील

नवी मुंबई येथे आयोजित भाजपच्या राज्य अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांना हात घालत शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. त्याचबरोबर एल्गार तपास एनआयएकडे दिल्याबद्दल त्यांनी उद्धव ठाकरेंचे कौतुकही केले. 

सावरकर, छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांशी शय्यासोबत
ते म्हणाले, महाराष्ट्रात जनादेशाचा अपमान झाला आहे. ठाकरे सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. आता सरकारशी थेट मुकाबला करायचा असल्याचे ते म्हणाले. 

भाजप आक्रमक: २२ फेब्रवारीला राज्यव्यापी आंदोलन

सावरकर आणि छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांशी शिवसेना शय्यासोबत करत आहे. ठाकरे सरकारने काँग्रेसच्या 'शिदोरी' मासिकावर बंदी घालण्याची हिम्मत दाखवावी, असे ते म्हणाले. 

अयोद्धेला जा तुमचं खरं रक्त जागं होईल
राम मंदिराचा उल्लेख करताना त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. ते म्हणाले, आता अनेक लोक अयोध्याला जायला निघाले आहेत. प्रभू श्रीराम त्यांना मार्ग दाखवतील. अयोध्याला नक्की जा, म्हणजे तुमचं खरं रक्त जागं होईल, असा टोलाही त्यांनी लगावला.