पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'३५० खासदार आहेत, राम मंदिरसाठी आणखी काय हवंय?'

संजय राऊत (ANI)

राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शिवसेना नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी राम मंदिराची लवकरच उभारणी करण्याची मागणी केली आहे. एनडीएकडे ३५० हून अधिक संख्याबळ आहे. राम मंदिर उभारण्यासाठी आणखी काय हवंय, असा सवाल, राऊत यांनी केला आहे. 

'एएनआय'ने या संबंधी वृत्त दिले आहे. राऊत म्हणाले की, 'मला वाटतं राम मंदिर उभारण्याची वेळ आहे. जर आता आपण राम मंदिर उभारले नाही तर देशाचा आपल्यावरील विश्वास उडेल. भाजपकडे आता ३०३ तर शिवसेनेकडे १८ खासदार आहेत. एनडीएचे ३५० हून अधिक खासदार आहेत. राम मंदिर उभारण्यासाठी आणखी काय हवंय ?'

लोकसभेतील उपाध्यक्षपदावर शिवसेनेचा दावा

तत्पूर्वी, राऊत यांनी लोकसभेतील उपाध्यक्षपदावर शिवसेनेचा नैसर्गिक हक्क असल्याचा दावा केला. एनडीएतील दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला त्या प्रमाणात स्थान मिळायला हवा, असे ते म्हणाले. 

उद्धव ठाकरे शिवसेनेच्या विजयी खासदारांसह एकविरा देवीच्या दर्शनाला

केंद्रीय मंत्रिमंडळातील खाते वाटपाबद्दल राऊत म्हणाले की, भाजपला लोकसभेत स्वबळावर बहुमत मिळाल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे. पण सहकारी पक्षांच्या ताकदीचाही सन्मान करणे आवश्यक आहे. त्यामुळे लोकसभेत १८ आणि राज्यसभेत तीन सदस्य असणाऱ्या शिवसेनेला केवळ एक मंत्रिपद देणे त्यांच्या क्षमतेच्या हिशेबाने योग्य नाही. त्यामुळे शिवसेनेला केंद्रीय मंत्रिमंडळात अधिक आणि योग्य प्रतिनिधित्व दिले जावे, असे राऊत यांनी म्हटले होते.

शिवसेनेला पुन्हा अवजड उद्योग खाते दिल्यावरून उद्धव ठाकरे नाराज

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:if NDA have more than 350 Mps what more is needed to construct the temple says shiv sena leader sanjay raut