पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुस्लिम आरक्षणामुळे मराठा आरक्षण धोक्यातः फडणवीस

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार मुसलमानांना शालेय-महाविद्यालयीन शिक्षणासाठी आरक्षण देण्यासाठी कायदा तयार करणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावरुन शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. त्याचबरोबर मुस्लिम आरक्षणामुळे ओबीसीसह मराठा आरक्षण धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त केली आहे. 

अर्थव्यवस्थेत सुधारणा, तिसऱ्या तिमाहीत जीडीपी विकासदर ४.७ टक्के

राज्याचे अल्पसंख्यक कल्याण मंत्री नवाब मलिक यांनी राज्य सरकार लवकर मुस्लिम आरक्षणसाठी कायदा करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांच्या घोषणेनंतर देवेंद्र फडणवीस हे विधिमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

एवढं खोटं का बोलता?; गृहमंत्र्यांचा काँग्रेस, ममता बॅनर्जींना सवाल

ते म्हणाले, अशा प्रकारचे आरक्षण दिल्यामुळे ओबीसीच्या आरक्षणावरही परिणाम होऊ शकतो. अधिकचे आरक्षण दिल्यास ओबीसीचे आरक्षण कमी करावे लागेल. मुस्लिम आरक्षणामुळे मराठा आरक्षणही धोक्यात येऊ शकते. 

निर्भया प्रकरणः फाशी जन्मठेपेत बदला, दोषी पवनची याचिका

यावर त्यांनी शिवसेनेवरही घणाघाती शब्दांत टीका केली. सरकार बनवण्यासाठी शिवसेनेने कोणकोणती सेटिंग केली आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेने आपली विचारधारा सोडून कोणकोणत्या मुद्द्यांवर तडजोड केली हे माहीत व्हायला हवे, अशी मागणीही त्यांनी केली.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:if muslim reservation implemented then maratha reservation in danger situation says devendra fadnavis