पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टॉयलेटमधील पाणी चटणीसाठी वापरणाऱ्या त्या इडली विक्रेत्यावर कारवाई होणार- FDA

इ़डली

चटणीसाठी टॉयलेटचं पाणी वापरणाऱ्या इडली विक्रेत्याचा व्हिडिओ  सोशल मीडियावर  व्हायरल झाला होता. व्हिडिओनंतर इडली विक्रेत्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी शैलेश आढाव यांनी दिली आहे. 

चटणीसाठी  टॉयलेटचं पाणी वापरणाऱ्या इडलीवाल्याचा व्हिडिओ  आमच्यापर्यंत पोहोचला आहे. आम्ही या प्रकरणात इडली विक्रेत्याची चौकशी करत आहोत त्याचबरोबर इतरही विक्रेत्यांची चौकशी करायला  आम्ही  सुरूवात सुरू केली आहे. या अस्वच्छ पाण्यामुळे लोकांच्या आरोग्यास धोका पोहचू शकतो, असं शैलेश आढाव म्हणाले. 

या व्यक्तीचा परवाना जप्त करण्यात आला आहे, जर चटणीमध्ये आरोग्यास हानिकारक घटक आढळले तर त्याचा परवाना रद्द करून योग्य ती कारवाई  इडली विक्रेत्यावर करण्यात येईल अशी  माहिती शैलेश यांनी दिली.