पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईतील सोसायट्यांमध्ये लवकरच सार्वजनिक पार्किंगची शक्यता

मुंबईत रस्त्यावर लावलेल्या गाड्या

कामाच्या तासांमध्ये मुंबईतील चारचाकी गाड्यांच्या पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सर्व सहायक आयुक्तांना नवा आदेश जारी केला आहे. ज्या ठिकाणी सार्वजनिक पार्किंग सुरू करता येईल, अशा मुंबई महापालिकेच्या हद्दीतील प्रत्येक वॉर्डामध्ये किमान पाच निवासी सोसायटया निवडण्याचे आदेश प्रवीण परदेशी यांनी दिले आहेत. ज्या सोसायट्या आपल्याकडील रिकामी जागा सार्वजनिक पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्यास तयार आहेत. तिथे या स्वरुपाचे 'पे ऍण्ड पार्क' सुरू केले जाणार आहे. विशेषतः मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरी, गोरेगाव आणि लोअर परळ या भागामध्ये अशा स्वरुपाच्या पार्किंगचा मोठा उपयोग होणार आहे. या ठिकाणी कामानिमित्त येणाऱ्यांच्या मोटारी लावायच्या कुठे, असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.

काश्मीरमध्ये असेल लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंह धोनीची पोस्टिंग

महापालिकेने केलेल्या नियोजनानुसार, सकाळच्यावेळी सोसायटीमधील नागरिक आपली गाडी घेऊन कामासाठी बाहेर पडले की ती जागा दिवसभर रिकामीच असते. त्यामुळे हीच जागा सार्वजनिक पार्किंगसाठी दिवसभर खुली करायची. तिथे लावल्या जाणाऱ्या गाड्यांमधून मिळणारे उत्पन्न सोसायटीलाच द्यायचे. जेणेकरून सोसायटीला आपले उत्पन्न वाढविण्यासाठी मदत होईल.

महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही या आधीही वॉर्ड अधिकाऱ्यांसोबत अशा सोसायटी निवडण्याचा प्रयत्न केला होता. पण ही संकल्पना सोसायटीमधील नागरिकांना तितकी आवडली नव्हती. त्यामुळे त्यांनी याला फारसा प्रतिसाद दिला नाही. पण आता आयुक्तांनी प्रत्येक वॉर्डामध्ये किमान पाच सोसायट्या सार्वजनिक पार्किंगसाठी निवडण्याचे आदेश दिले आहेत.

मी फक्त भाजपचाच नव्हे तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री : देवेंद्र फडणवीस

मुंबईतील सहकारी गृहरचना सोसायटी कल्याणकारी संघटनेचे विनोद संपत म्हणाले, कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपली गाडी सोसायटीमध्ये पार्किंगसाठी जागा आम्ही का द्यावी, सोसायटीच्या देखभालीवर आम्ही दरवर्षी लाखो रुपये खर्च करीत असतो. असे असताना आम्ही आमची सुरक्षितता का धोक्यात आणू, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.