पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कारभार हाती घेताच CM उद्धव ठाकरेंनी आरे कारशेडच्या कामाला दिली स्थगिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आरेतील वृक्षतोडीसंदर्भात सरकार आल्यावर ठाम भूमिका घेईन, असे आश्वान देणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. विधीमंडळ वार्ताहर संघाकडून उद्धव ठाकरेंचा मुंबईत सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. रातोरात झाडांची कत्तल करणे चुकीचे होते. आमचा विकासाला विरोध नाही, पण कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे. त्याचा संपूर्ण आढावा घेतल्याशिवाय काम सुरु करु दिले जाणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आरेतील वृक्षाच्या एकाही पानाला धक्का लागणार नाही, अशा शब्दांत त्यांनी आरेतील प्रकरणाचा मोठा निर्णय घेतला.  

'मातोश्री'वर नाही 'वर्षा'वरच राहणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मी सांगून मुख्यमंत्री झालेलो नाही, अशा शब्दांत त्यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला. मी पुन्हा येईन असे फडणवीसांना प्रचारामध्ये म्हटले होते. महागाई भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आमच्यासमोर आहेत. नव सरकार हे आपल्या सर्वांचं सरकार आहे. प्रत्येक पैशाचं उत्तर जनतेला द्यायच आहे. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणार नाही, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेईल, अशी अपेक्षा होती. त्याची सध्या चर्चा देखील सुरु आहे.

महाविकास आघाडीची अग्निपरीक्षा उद्याच

यावरही त्यांनी भाष्य केले. दिलेला शब्द पाळणे हे माझ्या आयुष्यातील तत्व आहे. शेतकऱ्यांना दिलेला शब्द ही पाळणार आहे, असे म्हणत त्यांनी लवकरच शेतकऱ्याला दिलासा देणारा निर्णय घेतला जाईल, असे संकेत दिले. शिवसेनेची सत्ता आली तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्तास्थापन केल्यानंतर हा शब्द तो खरा करुन दाखवणार का? यासाठी दोन दिवस प्रतीक्षा करावी लागेल, पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत त्यांनी दोन दिवसांत शेतकऱ्यांसदर्भातील निर्णय घेतला जाईल असे म्हटले होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: I have ordered to stop the work of Aarey metro car shed project Says Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray