पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मी काय म्हंटलं होतं क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतो'

नितीन गडकरी

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वीच एक वक्तव्य केले होते. क्रिकेटमध्ये आणि राजकारणात कोणत्याही क्षणी काहीही घडू शकते. या वाक्याचा प्रत्यय शनिवारी सकाळीच महाराष्ट्रात पाहायला मिळाला. कोणाच्या ध्यानीमनी नसताना शनिवारी पहाटे सहा वाजता राज्यातील राष्ट्रपती राजवट मागे घेण्यात आली. त्यानंतर राजभवनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधी झाल्याची माहिती वाऱ्याच्या वेगाने संपूर्ण देशात पसरली आणि अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला.

केंद्राचा महाराष्ट्रावर 'फर्जिकल स्ट्राईक', उद्धव ठाकरेंचा भाजपवर आरोप

शनिवारी घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरच एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा आपल्या जुन्या वाक्याची आठवण करून दिली. क्रिकेट आणि राजकारणात काहीही घडू शकते हे मी आधीच म्हटले होते. आज तुम्हाला कळले असेल की मला काय म्हणायचे होते, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना बहुमत चाचणी जिंकणार: अहमद पटेल

वास्तविक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची महाविकास आघाडी शनिवारीच सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता होती. पण त्यापूर्वीच राज्यात वेगवान घडामोडी घडल्या आणि राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना शपथ दिली.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:I had earlier said anything can happen in cricket and politics now you can understand what I meant says nitin gadkari