मी आतापर्यंत अनेक निवडणुका बघितल्या आहेत. अनेक निवडणुकांमध्ये भाग घेतला आहे. पण निवडणुकीचा अंदाज वर्तविणे वाटते तितके सोपे नाही. मला शिवसेना-भाजप युती राज्यात २२० जागांच्याही पुढे जाईल असे वाटत नाही, असे मत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.
सोलापूरात पावसामुळे मतदान केंद्रात शिरले पाणी
मनोहर जोशी मुंबईमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानासाठी निघताना त्यांनी हे मत मांडले. ते म्हणाले, माझे नाव जोशी असले तरी मी ज्योतिषी नाही. माझी बांधिलकी कायम शिवसेनेसोबतच राहिली आहे. मला असे वाटते की निवडणुकीनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री नक्की होईल. शिवसेनेच्या स्थापनेनंतर ठाण्यातील पहिल्या निवडणुकीपासून मी अनेक निवडणुका बघितल्या आहेत. निवडणुकीचे अंदाच वर्तविणे वाटते तितके सोप्पे नक्कीच नाही. त्यासाठी खूप अभ्यास असावा लागतो. अनेक घटक विचारात घ्यावे लागतात.
राज्यात पुन्हा एकदा युतीचेच सरकार येईल, नितीन गडकरींना विश्वास
निवडून आलेला कोणताही प्रतिनिधी जर संख्याबळ असेल तर मुख्यमंत्री होऊ शकतो. आदित्य ठाकरे यांना जर मुख्यमंत्री व्हायचे असेल तर त्यामध्ये काहीही गैर नाही, असेही मनोहर जोशी म्हणाले.