पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हृदयविकार, ६० वर्षांवरील आणि १५ वर्षांखालील व्यक्तींना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन नाही- आरोग्यमंत्री

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांना गरज पडल्यास हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध देणे उपयुक्त ठरत आहे. भारतानं आतापर्यंत अनेक देशांना कोरोना विषाणूच्या संसर्गाशी लढण्याकरता हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन दिले आहे, मात्र हे हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन राज्यात फक्त काहीच व्यक्तींना देण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनमुळे प्रतिबंधात्मक शक्ती वाढते म्हणून मुंबईत काही भागात या गोळ्या वाटपासाठी मान्यता देण्यात आली आहे. पण ज्यांना हृदयविकार आहे किंवा ६० वर्षांवरील आणि १५ वर्षांखालील व्यक्तींना त्या दिल्या जाणार नाहीत, असंह टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. कोणीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या घेऊ नये  असंही  आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

कोविड-१९ : या निर्णयासंदर्भात ममतांनी मोदी-शहांकडे मागितले स्पष्टीकरण

मुंबईत राज्याच्या इतर शहरांच्या तुलनेत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. अनेक ठिकाणं ही रेड झोन म्हणून घोषीत करण्यात आली आहेत, तसेच मुंबईत काही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्या देण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र त्या गोळ्या ठराविक व्यक्तींनाच देण्यात येणार आहे असं टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

पालघरमधील घटना गैरसमजुतीतून, धार्मिक रंग देऊ नकाः ठाकरे

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा ४ हजार ६६६  वर पोहचला आहे.  मुंबईतील धारावीतही नव्याने काही केसेस समोर आल्या आहेत. ३० नव्या रुग्णांसह याठिकाणच्या कोरोनाग्रस्तांचा आकडा हा १६८ वर पोहचलाय. धारावीत आतापर्यंत ११ जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. राज्यातील मृतांचा आकडा हा २३२ वर पोहचला आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Hydroxychloroquine will not give to above 60 and below 15 age group people health minister