पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... आणि इंडिगोच्या त्या विमानाला इमर्जन्सी मोडवर मुंबईत परतावे लागले

इंडिगो विमान कंपनीचा मोठा निर्णय

मुंबईहून हैदराबादला निघालेल्या इंडिगोच्या एअरबस ३२० निओ विमानाचे गुरुवारी पहाटे मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानाच्या एका इंजिनामध्ये बिघाड झाल्यामुळे हे विमान पुन्हा मुंबईला उतरविण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत.

शताब्दी एक्स्प्रेसमधला ब्रेड अनारोग्यदायी, अहवालातून समोर

मुंबई विमानतळावरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिगो एअरलाईन्सचे हे विमान गुरुवारी १२.५० वाजता मुंबई विमानतळावरून उड्डाण करणार होते. या विमानाने रात्री १.०३ वाजता उड्डाण केले. पण उड्डाणानंतर काही वेळातच एका इंजिनामध्ये बिघाड असल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. त्यामुळे हे विमान लगेचच मुंबई विमानतळाकडे वळविण्यात आले. 

... आता राहुल गांधी सरकारविरोधात देशव्यापी यात्रा काढणार

उड्डाणानंतर रात्री १.१७ वाजता वैमानिकाने इमर्जन्सी लँडिंगसाठी मुंबईतील हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. त्यानंतर मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंगसाठीची सर्व तयारी कऱण्यात आली. रुग्णवाहिका, अग्निशामक दलाच्या गाड्या तैनात ठेवण्यात आले. नियंत्रण कक्षाने प्राधान्याने हे विमान उतरण्यासाठी तयारी केली आणि रात्री १.४१ वाजता हे विमान मुंबई विमानतळाच्या मुख्य धावपट्टीवर उतरविण्यात आले.