पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

घाटकोपरमध्ये ऑनर किलिंग; पित्यानेच केली मुलीची हत्या

शिर्डी तिहेरी हत्या

घाटकोपरच्या एलबीएस मार्गावर रविवारी एका 20 वर्षाच्या तरुणीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेमध्ये सापडला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न केल्यामुळे वडिलांनीच आपल्या मुलीची हत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे. या घटनेमुळे घाटकोपरमध्ये खळबळ उडाली आहे. 

धारावीत नाल्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

मिनाक्षी चौरसिया असं हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. 4 महिन्यापूर्वी मिनाक्षीने तिचा प्रियकर ब्रिजेश चौरसिया याच्यासोबत पळून जाऊन लग्न केले होते. ब्रिजेश हा देखील घाटकोपरमध्ये राहतो. या लग्नाला मिनाक्षीच्या कुटुंबियांचा विरोध होता. मिनाक्षीच्या वडिलांनी तिचे दोन वेळा लग्न ठरवले होते. मात्र तिने लग्नाला नकार दिला होता. लग्नाला विरोध करत मिनाक्षीने तिच्या प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न केल्यामुळे तिच्या वडिलांना खूप राग आला होता. 

राज्यातील 52 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मिनाक्षीने पळून जाऊन लग्न केल्यामुळे लोकं नाव ठेवत होती तसचं बदनामी होत होती. त्यामुळे संतप्त झालेल्या मिनाक्षीच्या वडिलांनी तिचा काटा काढायचा ठरवला. त्यांनी मिनाक्षीला गोड बोलून तिला भेटण्यासाठी एलबीएस मार्गावर बोलावले. वडिलांनी बोलावले म्हणून मिनाक्षी आनंदामध्ये गेली. मात्र संतप्त झालेल्या तिच्या वडिलांनी चाकूने तिचा गळा चिरून तिची हत्या केली. या घटनेचा तपास करताना मिनाक्षीचे वडील राजकुमार चौरसिया यांनीच तिची हत्या केली असल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. 

NIA चे अधिकार वाढविणारे विधेयक लोकसभेत बहुमताने