पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिशा कायद्याची माहिती घेण्यासाठी गृहमंत्री आंध्रप्रदेश दौऱ्यावर

गृहमंत्री अनिल देशमुख

महिलांवरील अत्याचारांच्या घटनांना चाप बसावा यासाठी राज्यात कठोर कायदा आणण्यासाठी राज्य सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. आंध्रप्रदेश सरकारने आणलेल्या दिशा कायद्याची माहिती घेऊन त्याची अंमलबजावणी कशी करता येईल यासंबंधिची माहिती जाणून घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख आंध्रप्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. 

देवेंद्र फडणवीसांना नागपूर कोर्टाकडून जामीन मंजूर

महिलांवरील अत्याचाराची प्रकरणं जलदगतीने चालवून या घटनांमधील गुन्हेगारांना कठोर शिक्षा  व्हावी यासाठी आंध्रप्रदेश सरकारने 'दिशा कायदा' आणला. दिशा कायद्यानुसार २१ दिवसांमध्ये आरोपींना फाशीची शिक्षा दिली जाते. या कायद्याबाबत माहिती घेण्यासाठी गृहमंत्री आंध्रप्रदेशला गेले आहेत. आंध्रप्रदेश येथे पोलिस महासंचालक, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कार्यालयाला भेट देऊन ते कायद्याविषयीची सविस्तर माहिती घेणार आहेत. 

एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात, शेतकऱ्याला १० ते १५ गाड्यांनी उडविले

गृहमंत्र्यांच्या हैद्राबाद दौऱ्यादरम्यान त्यांच्यासोबत गृहराज्यमंत्री सतेज पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि पोलिस महासंचालक सुबोध जैस्वाल हे देखील उपस्थित आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. हिंगणघाट तरुणीला जिवंत जाळून हत्या प्रकरणानंतर आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी राज्यभरातून केली जात आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने सुध्दा आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. 

निर्भया प्रकरणातील दोषी विनयने आपटले भिंतीवर डोके, किरकोळ जखमी