पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पालघर प्रकरणी अटक केलेल्यांमध्ये एकही मुस्लिम नाही: गृहमंत्री

गृहमंत्री अनिल देशमुख

पालघरमध्ये चोरीच्या संशयावरुन दोन साधू आणि त्यांच्या गाडी चालकाची जमावाने निर्घृणपणे हत्या केली होती. या घटनेप्रकरणी आतापर्यंत १०१ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यापैंकी एकही जण मुस्लिम नाही, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. गृहमंत्र्यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला यावेळी त्यांनी हे सांगतिले.

मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यावरील महिला पोलिस कॉन्स्टेबलला कोरोना

तसंच, गृहमंत्र्यांनी ट्विट करत याप्रकरणी अटक केलेल्यांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. याप्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा सातत्याने प्रयत्न करणाऱ्यांनी ही यादी नक्की पहावी, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे. पालघरची घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. याप्रकरणी धार्मिक राजकारण केले जात आहे. मात्र ही राजकारण करण्याची वेळ नाही. कोरोनाविरोधातील लढाईमध्ये सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यावरील महिला पोलिस कॉन्स्टेबलला कोरोना

दरम्यान, पालघरची घटना दुर्देवी असून या भागांमध्ये चोर शिरल्याच्या अफवेतून ही घटना घडली. वेषांतर करुन लहान मुलांना पळवणारी टोळी आली असल्याची अफवा या भागात पसरली होती, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या ८ तासांत १०१ आरोपींना अटक केली. आज त्यांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. तसंच, या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सूपूर्द करण्यात आला असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

कामावर पोहोचण्यासाठी बस कंडक्टर २१ किलोमीटर धावला 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:home minister anil deshmukh says no muslim among those arrested in palghar mob lynching incident