पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धीरज आणि कपिल वाधवान सीबीआयच्या ताब्यात: गृहमंत्री

कपिल वाधवान

वाधवान बंधूंना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. रविवारी सीबीआयने धीरज आणि कपिल वाधवान यांना सातारा पोलिसांकडून ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. साताऱ्यामध्ये वाधवान कुटुंबियांना क्वारंटाइन करण्यात आले होते. २३ तारखेला त्यांचा क्वारंटाइनचा अवधी संपला. त्यानंतर आज सीबीआयने साताऱ्यात जात वाधवान बंधूना ताब्यात घेतले. 

संकटाच्या काळातही काही जणांकडून राजकारण, CM ठाकरेंची टीका

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत सांगितले की, 'सीबीआयच्या टीमने साताऱ्यात जात कपिल आणि धीरज वाधवान यांना ताब्यात घेतले आहे. सातारा पोलिसांच्या सहकार्याने वाधवान बंधूना सीबीआयने ताब्यात घेतले असून पुढील कारवाईसाठी साताऱ्याहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरु आहे.' तसंच, तर अमिताभ गुप्तांचा चौकशी अहवाल आज किंवा उद्या येणार असल्याचंही देशमुखांनी सांगितलं आहे.

देशात कोरोनाविरोधातील लढाईचे नेतृत्व जनता करतेय: मोदी

दरम्यान, डीएचएफएल आणि येस बँक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी कपिल आणि धीरज वाधवान कुटुंबियांसोबत लॉकडाऊन असताना सुद्धा महाबळेश्वर येथे गेले होते. सातारा पोलिसांनी ७ एप्रिल रोजी ताब्यात घेतले होते. त्यांनी त्यांना पाचगणी येथे क्वारंटाइन करण्यात आले होते. राज्याचे गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांनी त्यांना लॉकडाऊनमध्ये प्रवास करण्याची परवानगी देणारे पत्र दिले होते. याच पत्रामुळे त्यांनी मुंबई ते सातारा असा प्रवास केला होता. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यावर अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.

ट्रम्प पत्रकारांच्या प्रश्नांना घाबरले? आता नियमित पत्रकार परिषद बंद

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:home minister anil deshmukh says cbi team has taken both kapil and dhiraj wadhwan into custody