पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सरकारच्या सूचनांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कारवाई होणार: गृहमंत्री

गृहमंत्री अनिल देशमुख

राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. अशात सराकारने दिलेल्या सूचनांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल. तसंच कोरोनाविषयी चुकीची अफवा पसरवणाऱ्यांविरोधात देखील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. कोरोना विषाणूसंदर्भात मुंबईत गृहमंत्र्यांची पत्रकार परिषद झाली यावेळी त्यांनी कारवाई करण्याचा इशारा दिला. 

भारतात अद्याप कोरोनाचा समूह संसर्ग नाही, ICMR ची माहिती

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की, मास्क आणि सॅनिटायझरचा साठा करु नका. मास्क आणि सॅनिटायझरची साठवणूक करुन ठेवली तर त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल. तसंच कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी गृहविभागाने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रतील सर्व कारागृहातील ६० हजारांपेक्षा जास्त कैद्यांच्या आरोग्याची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच नव्याने भरती होणाऱ्या कैद्यांना वेगळे ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. 

मोदी 'लॉक डाउन'ची घोषणा करणार ही फक्त अफवा

दरम्यान, नागरिकांनी गर्दी टाळावी, लोकलने प्रवास करणे टाळावा आणि घरात बसून काम करावे असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे. मुंबईमध्ये लोकलचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र लोकलमधून कोरोनाचा संसर्ग होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी लोकलने प्रवास टाळा. महत्वाचे काम असल्याशिवाय घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले. 

देशात कोरोनाचा चौथा बळी; पंजाबमध्ये उपचारादरम्यान एकाचा मृत्यू

दरम्यान, लग्न समारंभ छोट्या पध्दतीने करावा किंवा लग्न समारंभांची तारिख पुढे ढकलावी, अशा सूचना त्यांनी केल्या. प्रशासनाकडून योग्यरितिने काम सुरु आहे आणि जनतेने देखील चांगले सहकार्य करावे अशी अपेक्षा गृहमंत्र्यांनी व्यक्त केली. तसंच, ज्या ठिकाणी मोठी गर्दी असेल त्याठिकाणी कारवाई केली जाईल, असे देखील गृहमंत्र्यांनी सांगितले. 

कोरोना: पश्चिम आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील एसी लोकलसेवा उद्यापासून बंद

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:home minister anil deshmukh says action will be taken against those who do not comply with the governments instructions