पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'आरोपीला कठोर शिक्षा देऊ, नागरिकांनी संयम बाळगावा'

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (शिवसेना टि्वटर)

'हिंगणघाट प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होईल. तसंच असे कृत्य करण्याचे धाडस कोणी करणार नाही असा कायदा आणू, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. राज्यातील जनतेने संयम राखावा, असे आवाहन  देखील मुख्यमंत्र्यांनी केले आहे. हिंगणघाट प्रकरणातील पीडितेच्या मृत्यूनंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी केली जात आहे. 

 

हिंगणघाट प्रकरणी ग्रामस्थ संतप्त; पोलिस आणि रुग्णवाहिकेवर दगडफेक

हिंगणघाट प्रकरणातील पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी असे सांगितले की, ' या घटनेचे वर्णन करता येणार नाही. ही पाशवी घटना असून ही हत्या आहे. आरोपींवरचा गुन्हा सिध्द करुन त्याला शिक्षा देऊ. तसंच, असे कृत्य करण्याचे पुन्हा कोणाचे धाडस होणार नाही असा कायदा आणू. हैदराबादपेक्षा कडक कायदा करु. फक्त नागरिकांनी संयम बाळगावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

सार्वजनिक रस्ता बेमुदत काळासाठी अडवू शकत नाही - सुप्रीम कोर्ट

तसंच, 'महाराष्ट्रात असा घटनांना आणि अशा घटना घडवणाऱ्यांना थारा नाही. या प्रकरणाचा पाठपुरावा करुन लवकरात लवकर आरोपीला शिक्षा दिली जाईल.', असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, हिंगणघाट पीडितेचा उपचारा दरम्यान, नागपूरच्या ऑरेंजसिटी रुग्णालयात मृत्यू झाला. सकाळी ६.५५ वाजता पीडितेने अखेरचा श्वास घेतला. पीडितेच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातील जनता संतप्त झाली आहे. आरोपीला फासावर लटकवा, अशी मागणी केली जात आहे. 

हिंगणघाट प्रकरण: पीडित कुटुंबातील एका व्यक्तीला मिळणार सरकारी नोकरी