पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... म्हणून मुख्यमंत्र्यांशिवाय आमदारांचा शपथविधी पार पडला

महाराष्ट्र विधानसभा

१४ व्या विधानसभेत निवडून आलेले सदस्य बुधवारी शपथ घेत आहेत. पण या घटनेचे एक वेगळेपण आहे. सहसा सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत नव्या सदस्यांचा शपथविधी होत असतो. पण बुधवारी शपथविधी होत असताना नवे सरकारही अस्तित्त्वात आलेले नाही आणि मुख्यमंत्रीही नाहीत. 

महाविकास आघाडीत इतर कोणाला काय मिळणार?

महाराष्ट्र विधान भवनाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, नव्या विधानसभेत पहिल्यांदा मुख्यमंत्री शपथ घेत असतात. त्यानंतर इतर सदस्यांना शपथ दिली जाते. शपथ झाल्यानंतर त्याच दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी विश्वासदर्शक ठरावावर मतदानही घेतले जाते. सध्यातरी राज्यात कोणीही मुख्यमंत्री नाही. तरीही शपथविधी सोहळा होतो आहे. याचे कारण अर्थातच सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेला अंतरिम आदेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी पाच वाजेपर्यंत सदस्यांचा शपथविधी पूर्ण करण्याचे आदेश विधीमंडळाला दिले होते. त्यामुळेच नव्या सदस्यांना शपथ दिली जाते आहे. एकदा सर्व सदस्यांची शपथ पूर्ण झाल्यावर नवी विधानसभा पूर्णपणे कार्यरत होईल. 

मी रोहित सुनंदा राजेंद्र पवार शपथ घेतो की...

पुढील मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांचे मंत्रिमंडळ तयार होईल. त्यानंतर विधानसभेचे पुन्हा अधिवेशन बोलावले जाईल. त्यामध्येच नव्या सरकारला आपले बहुमत सिद्ध करावे लागेल, असेही राजेंद्र भागवत यांनी स्पष्ट केले.