पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये पावसाचा जोर, रस्ते-लोकल वाहतूक उशिराने

मुंबई पाऊस

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि वसई या सर्वच ठिकाणी सोमवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरू झाल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दुसरीकडे मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल वाहतूकही पावसामुळे उशिराने सुरू आहे. मध्य रेल्वेवरील लोकल वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरू असल्याची माहिती काही प्रवाशांनी दिली. पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूकही उशिराने सुरू आहे.

वेस्ट इंडिजला व्हॉईट वॉश, विराट कोहली ठरला सर्वात यशस्वी कर्णधार!

पावसाचा जोर पहाटेपासून कायम असल्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. हिंदमाता, दादर, परळ, शीव या भागात काही ठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहे. यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सोमवारी गणेश चतुर्थीची सुटी असल्यामुळे मंगळवारी या आठवड्यातील कामाचा पहिला दिवस आहे. त्याच दिवशी रस्ते वाहतूक आणि लोकल वाहतूक दोन्हीवरही पावसाचा परिणाम झाला आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहेत.

मुंबईप्रमाणेच वसई-विरार, कल्याण-डोंबिवली या भागातही पाऊस पडतो आहे. त्यामुळे तिथेही काही ठिकाणी पाणी साचले आहे.

युतीमध्ये 'विघ्न' येणार नाही : सुधीर मुनगंटीवार

दीड दिवसाच्या गणपतीचे आज विसर्जन करण्यात येणार आहे. पण समुद्रात भरतीच्यावेळी लाटांची उंची जास्त राहणार असल्यामुळे नागरिकांनी कृत्रिम किंवा नैसर्गिक तलावांत विसर्जन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. विसर्जनसाठी समुद्रात आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नये, अशीही सूचना देण्यात आली आहे.