पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

येत्या २४ तासात मुंबईत अतिवृष्टीचा इशारा

मुंबई पाऊस (संग्रहित छायाचित्र)

गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता आहे. येत्या २४ ते ४८ तासांमध्ये मुंबईत अतिवृष्टीचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे. मुंबईमध्ये आठवडाभरापासून पाऊस पडत नाही त्यामुळे मुंबईकरांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. 

माहिती अधिकार कायदा सुधारणा विधेयकावरून सोनिया गांधींची 

मुंबईमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे. येत्या काही तासामध्ये मुंबईत अतिवृष्टी होईल असे हवामान खात्याने सांगितले आहे. रात्रीच्या वेळी अतिवृष्टी होईल. मात्र सकाळी जोरात पाऊस पडणार नाही, असं हवामान खात्याने सांगितले. दरम्यान, २६ आणि २७ जुलैला मुंबईमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 

'मराठा क्रांती ठोक मोर्चा' विधानसभेच्या सर्व जागा लढवणार

यावर्षी मान्सूनचे आगमन उशीराने झाले. त्यामुळे मुंबईकरांना जून महिन्यातही उकाडा सहन करावा लागला. त्यानंतर काही दिवस मुंबईत मुसळधार पाऊस पडला. मात्र गेल्या आठवडा भरापासून मुंबईमधून पाऊस गायब झाला. त्यामुळे मुंबईकर पुन्हा उकाड्याने हैराण झाले असून मुंबईकर चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. आता पुन्हा मुंबईत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

युवीनं लाराला सांगितला गांगुलीच्या 'दादागिरी'चा किस्सा