पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईत मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी पाणी साठले

मुंबईत हिंदमाता भागात पाणी साठले

मुंबई शहर आणि उपनगरांत मंगळवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे सखल भागात पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी सकाळीही पाऊस सुरूच होता. पण मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेली लोकलसेवा सुरळीत आहे.

मुंबईमध्ये येते दोन ते तीन मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यातच शुक्रवार आणि शनिवारी पावसाचा जोर जास्तच असेल, असे कुलाबा वेधशाळेने म्हटले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मंगळवारी रात्रीपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडतो आहे. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे सायन, कुर्ला, हिंदमाता या भागातील काही ठिकाणी पावसाचे पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिकेचे कर्मचारी आणि वाहतूक पोलिस विविध ठिकाणी कार्यरत आहे. पावसामुळे आणि साठलेल्या पाण्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी काळजी घेण्यात येते आहे.

मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक बुधवारी सकाळी सुरळीत होती. रस्त्यावरील वाहतुकीचा वेग मंदावला असला, तरी कोठेही मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे अद्याप दिसलेले नाही.