मुंबईमध्ये गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. गणपती बाप्पाचे आगमन पावसासह झाले आहे. सकाळीपासून पडणाऱ्या पावसामुळे रेल्वेसह रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सध्या पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. ओडिशा येथील किनारपट्टीवर आलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर मान्सून पुन्हा सक्रीय झाला आहे.
Maharashtra: Rain lashes parts of Mumbai; visuals of water logging from King's Circle. pic.twitter.com/YBP3RCPpYE
— ANI (@ANI) September 3, 2019
J&K : सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांना विमा संरक्षणाचे आश्वासन
मुंबईसह उपनगरामध्ये सध्या जोरदार पाऊस पडत आहे. परळ, दादर, माटुंगा, सायन, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड ठाण्यासह नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे सायन, किंग सर्कल परिसरामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांमध्ये सांताक्रुझमध्ये १३१ मिमी, ठाण्यात १९० मिमी, रत्नागिरीत १३६ मिमी, अलिबागमध्ये १३३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मुंबईमध्ये पुढील ४ दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
चिदंबरम यांना दिलासा, तिहार तुरुंगात जाणे तूर्त टळले
गणपती बाप्पाचे आगमन मुसळधार पावसामध्ये झाले. दरम्या आज दीड दिवसाच्या गणपती बाप्पाला निरोप दिला जात आहे. ऐन विसर्जनाच्या वेळी मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे गणेशभक्तांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर समुद्रात भरतीच्यावेळी लाटांची उंची जास्त राहणार असल्यामुळे नागरिकांनी कृत्रिम किंवा नैसर्गिक तलावांत विसर्जन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. विसर्जनसाठी समुद्रात आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नये, अशीही सूचना देण्यात आली आहे.