पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईतील गणपती मंडपात शिरले पावसाचे पाणी

गणपती मंडपात शिरले पावसाचे पाणी

मुंबईसह उपनगराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तर दुसरीकडे या मुसळधार पावसाचा फटका गणेशोत्सव मंडळांना बसला आहे. मुंबईतल्या अनेक गणेशोत्सव मंडळांच्या गणपती मंडपात पाणी शिरले आहे. 

पाकच्या माजी राजनैतिक अधिकाऱ्याचे पॉर्नस्टारने उघडले डोळे

माटुंगा, दादर, परळ, चिंचपोकळी या परिसरात मुसळधार पावसामुळे पाणी साचले आहे. पावसाचे पाणी थेट गणपती मंडपात शिरले आहे. लालबागच्या राज्यासह अनेक गणेशोत्सव मंडळांना पावसाचा फटका बसला आहे. पावसामुळे अनेक गणेशोत्सव मंडळातील वीज गेली आहे. त्यामुळे या मंडळाच्या कार्यकर्त्यांची पळापळ झाली. 

'या' मुद्द्यावरुन लता मंगेशकर यांनी घेतली सरकारविरोधी भूमिका

गणपतीच्या दर्शनासाठी दरवर्षी भाविकांची असणारी गर्दी यावर्षी पावसामुळे कमी झाली आहे. त्याचसोबत या परिसरात पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. त्याचसोबत रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळामध्ये भाविकांची गर्दी कमी झाली आहे. तसेच जे भाविक दर्शनसाठी आले होते त्यांचे वाहतूक कोंडी आणि रेल्वेसेवा ठप्प झाल्यान हाल झाले आहे.

आमीर खानने मागितली माफी, नेटिझन्सनी उडविली खिल्ली