पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईसह उपनगरात पावसाची विश्रांती; रेल्वे वाहतूक सुरळीत

मुंबई पाऊस

मुंबई शहरासह उपनगरामध्ये शुक्रवारी सकाळी पावसाने हजेरी लावली. मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईमध्ये सकाळी जोरदार पाऊस पडला. दादर, परळ, माटुंगा, सायन, कुर्ला, घाटकोपर, वांद्रे, खार, सांताक्रुझ आणि अंधेरी परिसरात मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे कामाला जाणाऱ्या मुंबईकरांची तारंबळ उडाली होती. तर भिवंडी, शहापूर, पालघर याठिकाणी देखील विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. 

शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या! अन्यथा तीव्र आंदोलन करु : राजू शेट्टी

दरम्यान, मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. माटुंगा स्थानकाजवळ सकाळी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक पूर्व पदावर आली. तर दुसरीकडे ट्रान्सहार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक देखील ठप्प होती. रबाळे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दुरुस्तीचे काम झाल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आली आहे. पावसामुळे लोकलसेवा विस्कळीत झाल्यामुळे कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचे हाल झाले. 

फडणवीसांना मुख्यमंत्री करुन दाखवा, राऊतांचे भाजपला चॅलेंज

सध्या पावासाने विश्रांती घेतली आहे. मात्र मुंबईशहरासह उपनगरामध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काही भागांमध्ये विजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.