पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईमध्ये पुन्हा धो-धो; मध्य आणि हार्बर रेल्वे उशिराने

पाऊस

मुंबईला मुसळधार पावसाने पुन्हा झोडपून काढण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही तासांपासून मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे रेल्वे, रस्ते आणि विमान सेवेवर परिणाम झाला आहे. येत्या २ ते ३ तासांमध्ये मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

सरकारचा मोठा निर्णय! धनगर समाजाला एसटी प्रवर्गातील सवलती मिळणार

मुंबईतल्या वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, कांदिवली, बोरीवली, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे या परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झाली आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे. तर मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटं उशिराने सुरु आहे. त्यामुळे कामावरुन घरी जाणाऱ्या मुंबईकरांना आता गर्दीचा सामना करावा लागणार आहे. 

गणेश नाईकांनी राष्ट्रवादीची वाट लावलीः जितेंद्र आव्हाड

दरम्यान, मुंबई पाठोपाठ ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूरसह पालघर आणि भिवंडीतही मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे भिवंडीतील जनजीवन विस्कळीत झाले असून मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मुसळधार पावसामुळे भिवंडीतील शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे. 

गावसकरांचे विराटसंदर्भातील वक्तव्य माजरेकरांना खटकलं