पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात

पाऊस

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. ठाणे, पालघर, भिवंडीमध्ये देखील मुसळधार पाऊस पडत आहे. 

EVM विरोधात उठावाची विरोधकांची हाक, २१ ऑगस्टला पक्षविरहित मोर्चा

मुंबईमध्ये काल रात्रीपासून पाऊस पडत आहे. मात्र सकाळपासून विश्रांत घेतलेल्या पावसाने दुपारनंतर चांगलाच जोर धरला. मुंबईतल्या वरळी, परळ, दादर, माटुंगा, कुर्ला, घाटकोपर या भागामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. तर अंधेरी, जोगेश्वरी, सांताक्रुझ, कांदिवली या भागामध्ये देखील मुसळधार पाऊस पडत आहे. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या तरी तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक सुरळीत सुरु आहे. 

मनमोहन सिंग पुन्हा राज्यसभेत जाणार, पण...

ठाण्यामध्ये सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. घोडबंदर रोड, कासारवडवलीजवळ मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. दरम्यान, येत्या काही तासांमध्ये मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

पुण्यात वाड्याची भिंत कोसळली; सुदैवाने जीवितहानी नाही