पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Rain : मुंबईत पावसाचा जोर थांबता थांबेना!

मुंबईत पावसाचा जोर कायम

मुंबईसह उपनगरांत संततधार सुरूच असून पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईकरांनी महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

गडचिरोलीत पूरसदृश्य स्थिती, अहेरीत २५ गुरांचा विद्युत प्रवाहाने मृत्यू

आज सकाळी मुंबईतील सखल भाग असलेल्या सायन, दादर आणि हिंदमाता परिसरात पावसाचे पाणी साचले. सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होत असल्याने पाऊस मुंबईकरांचा हिरमोड होण्याची दाट शक्यता दिसत आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने मुंबईकर मोठ्या प्रमाणावर गणपती दर्शनासाठी बाहेर पडू शकतात. हे लक्षात घेत प्रशासनाने नागरिकांनी महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे, असा इशारा देण्यात आला आहे.

कोल्हापूरः राधानगरी धरणाचे ५ दरवाजे उघडले, सतर्कतेचा इशारा

पालघर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. पालघरमधील डहाणू, जव्हारा मोखाडा आणि तलासरी परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. पालघरमधील कवडास धरण आणि धामणी धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली.