पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वसई, विरारमध्ये मुसळधार; सखल भागात साचले पाणी

वसई पाऊस

गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावासाने आज पुन्हा हजेरी लावली. मुंबईसह उपनगराला सकाळपासून पावसाने झोडपून काढले. तसंच वसई, विरार, नालासोपारा भागामध्ये देखील सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचले आहे. सकाळी पाऊस कमी असल्याने पालकांनी मुलांना शाळेत पाठवले. मात्र दुपारनंतर मुसळधार पाऊस सुरु झाल्यामुळे वसई आणि विरारमध्ये शाळांना सुट्टी देण्यात आली. 

मुंबईमध्ये पावसाची बँटिंग सुरुच; मध्य आणि हार्बर रेल्वे उशीराने

नालासोपारात सेंट्रल पार्क, स्टेशन रोड, तुलिंज रोड, अचोले रोड, गाला नगर, शिर्डी नगर, समेल पाडा परिसरात पाणी साचले. विरारच्या विवा कॉलेज परीसर गुडगाभर पाणी साचले. तर वसईच्या गोलानी नाका, डीजीनगर, दिवानमान आणि ग्रामीण भागात पाणी साचले. त्यामुळे नागरिकांची तारंबळ उडाली. पावसाचे पाणी दुकानात शिरल्यामुळे दुकानातील सामानांचे मोठे नुकसान झाले. तर अनेक सोसायटीमध्ये, काही नागरिकांच्या घरामध्ये देखील पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. 

'पाकिस्तानमध्ये ३० ते ४० हजार दहशतवादी सक्रीय'