पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पावसामुळे मुंबईकरांची पुन्हा त्रेधातिरपीट

पावसामुळे मुंबईकरांची त्रेधातिरपीट

मुंबई उपनगरांसह  ठाणे, आणि पालघर जिल्ह्यात रात्री पासून मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी पुन्हा एकदा येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई उपनगरे, भिवंडी, मीरारोड, भाईंदर, वसईला पावसाने रात्रीपासून झोडपून काढले. अनेक भागांमध्ये ठिक ठिकाणी पाणी साचले असून रस्त्यांवरही पाणी आल्याने वाहनांना पाण्यातून वाट काढत पुढे जावे लागत आहे.

 

'काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत मनसेला स्थान नाही'

पश्चिम उपनगरातील अंधेरी, बोरीवली, कांदिवली मीरारोड तसेच ठाण्यातील कल्याण आणि डोंबिवली परिसरातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. भिवंडी आणि परिसरालाही रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक घरे आणि दुकानांत पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत.