पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईत २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज

बेलापूरला कोकण भवन परिसरात साचलेले पाणी (बच्चन कुमार, हिंदुस्थान टाइम्स)

क्षणभर विश्रांती घेऊन पुन्हा एकदा मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईतील काही भागात रविवारी रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू होता. सोमवारी पहाटे पावसाचा जोर वाढला. अनेक सखल भागात पावसामुळे पाणी साचलं. तर रेल्वे रस्ते वाहतुकीवरही याचा मोठा परिणाम झाला. पावसानं सोमवारी दुपारी क्षणभर विश्रांती घेतली मात्र संध्याकाळपासूनच शहरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. येत्या २४ तासांत शहरात मुसळधार पाऊस कोसळणार असा अंदाज वर्तवला जात आहे.

तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरू असली तरी रेल्वे उशीरानं धावत आहेत. तर संध्याकाळी घरी परतण्याची वेळ असल्यानं रस्ते वाहतुकीवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. सखल भागात पाणी साचलं आहे या पाण्याचा हळूहळू निचरा व्हायला सुरूवात झाली आहे. मात्र साडेपाचनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसानं सखल भागात पुन्हा पाणी साचण्याची भीती आहे. सोमवारी संध्याकाळी साडेसहापर्यंत शहरात ही स्थिती कायम आहे. 

मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने ५ जुलैपर्यंतच्या पावसाचा अंदाज जारी केला आहे. मुंबईत काही दिवस पावसाचा जोर असाच कायम असेन असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पावसामुळे सोमवारी सकाळी अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती.

वादळी वाऱ्यामुळे मरिन लाइन्स स्थानक येथे बांधकाम साहित्य पडल्याने ओव्हरहेड वायर तुटली होती. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर परिणाम झाला होता.

पालघर-सफाळे, पालघर-बोईसर मार्गावर पाणीच पाणी साचले आहे. मुसळधार पावसामुळे पालघर जलमय झाले आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. दक्षिण गुजरात तसेच पालघर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून वलसाड फास्ट पॅसेंजर, फ्लाइंग राणी यांच्यासह अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पालघरमध्येही येत्या २४ तासांच अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.