पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात; मध्य रेल्वे उशिराने

मुंबई पाऊस

मुंबईसह उपनगरामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे.  ठाण्यामध्ये सुध्दा सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. तसंच पावसामुळे मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकलसेवेवर परिणाम झाला आहे. दरम्यान, गुरुवारी मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र गुरुवारी पाऊस पडला नाही. मात्र आज सकाळपासून पावसाने जोरदार बॅटिंग सुरु केली आहे. 

गॅसच्या वासाने मुंबईकर घाबरले; अग्निशमन दलाकडे अनेक तक्रारी

मुंबईच्या परळ, दादर, माटुंगा, सायन, कुर्ला, घाटकोपर, चेंबूर या  परिसरामध्ये जोरदार पाऊस पडत आहे. तर पश्चिम उपनगरातील विलेपार्ले, वांद्रे, जोगेश्वरी, गोरेगाव, दहिसर आणि अंधेरीमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचालयला सुरुवात झाली आहे. तर मध्य रेल्वे १० ते १५ मिनिटं उशिराने धावत आहे. सकाळपासून मुंबईमध्ये ढगाळ वातावरण आहे. एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने चांगलाच जोर धरला आहे. 

९ ऑक्टोबरपासून बेस्ट कर्मचारी बेमुदत संपावर