पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईमध्ये पावसाची बँटिंग सुरुच; मध्य आणि हार्बर रेल्वे उशीराने

मुंबई पाऊस (संग्रहित छायाचित्र)

गेल्या काही दिवसांपासून दडी मारल्या पावसाने मध्यरात्रीपासून मुंबईसह उपनगराला झोडपून काढले. या पावसामुळे मुंबईसह उपनगरातील रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सकाळपासून पावसाचा जोर कमी जास्त होत असून पावसामुळे अनेक ठिकाणी सकल भागामध्ये पाणी साचले आहे. मुंबईतल्या परेल, दादर, माटुंगा, सायन, कुर्ला, घाटोकपर, विक्रोळी, मुलुंड, चेंबूर या परिसरामध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. पूर्व द्रुतगती मार्गावर आणि जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

रत्नागिरीच्या मिरजोळे येथे भूस्खलन; जमिनीचा भाग ४० फूट खोल खचला 

दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळी सायन - कुर्ला रेल्वे स्थानका दरम्यान पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. तसंच कुर्ल्याजवळ पाणी साचल्यामुळे हार्बर रेल्वेची देखील वाहतूक विस्कळीत झाली होती. आता देखील दोन्ही मार्गावर तिच परिस्थिती आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक १० ते १५ मिनिटं उशीराने धावत आहे. त्यामुळे सर्वच रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली आहे. 

मोदी सरकारविरोधात अण्णा हजारे पुन्हा आंदोलन करणार?

दरम्यान, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी, वसई आणि विरार या परिसरामध्ये देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, वसई, विरारमध्ये पाणी साचले आहे. पाणी साचल्यामुळे वसई, विरारामध्ये शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. पाणी साचल्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. येत्या काही तासामध्ये मुंबईसह उपनगर आणि ठाणे, नवीमुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

प्रगती आणि डेक्कन एक्स्प्रेस शुक्रवारपासून १५ दिवसांसाठी रद्द