पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबई, ठाण्यात आज अतिवृष्टीचा इशारा

मुंबई पाऊस

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईला झोडपणारा पाऊस आजही (रविवार) कायम राहणार आहे. मुंबई आणि परिसरातील काही भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याशिवाय मुंबईतील समुद्रात ४.४ मीटरच्या लाटा उसळणार असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, सकाळपासून काही भागात रिमझिम पाऊस सुरु आहे.

पावसाचे आतापर्यंत ५ बळी, २८ ठिकाणी झाडं उन्मळून पडण्याच्या घटना

येत्या २४ तासांत मुंबईत काही ठिकाणी मुसळधार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दि. ३ जुलै रोजी पुन्हा एकदा मुंबई, ठाणे आणि पालघरमधील काही ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गातही मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोल्हापूरलाही पावसाने चांगलेच झोडपले आहे. येत्या दोन-तीन दिवस पावसाचे हेच प्रमाण राहण्याची शक्यता आहे. पुण्यातील काही भागात मुसळधार तर काही भागात रिमझिम पाऊस पडत आहे.

पहिल्याच पावसात मुंबईची 'तुंबापुरी'