पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबई, ठाणे, कोकणात अतिवृष्टीचा इशारा; शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई पाऊस

मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगडमध्ये गुरुवारी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुसळधार पावसामुळे या ठाकिणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुधवारी देखील मुंबईसह ठाण्यामध्ये विजांच्या कडकडाटासह काही भागात जोरदार पाऊस पडला. दरम्यान, मुसळधार पावसाचा इशारा पाहता मुंबई, ठाणे, कोकणातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यता आली आहे. शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. 

आदित्य ठाकरेंविरोधात सुजात आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात ?

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १९ सप्टेंबर रोजी मुंबई आणि ठाण्यात अतिवृष्टी होणार आहे. तर रायगड आणि पुण्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर २० सप्टेंबर रोजी पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडले. १८ ते २३ सप्टेंबर दरम्यान उत्तर कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून पोस्टरबाजी

हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी रात्री उशिरा ट्विट करत सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, १९ सप्टेंबर रोजी कोकण, ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि मुंबई परिसरात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

नाबाद अर्धशतकाच्या जोरावर विराटने रोहितचे दोन विक्रम टाकले मागे

दरम्यान, अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर मुंबई महापालिका देखील सज्ज झाली आहे. मुसळधार पावसा दरम्यान मुंबईकरांनी सावधानता बाळगावी असे आवाहन पालिकेने केले आहे. पालिकेने ट्विट करत मुंबईकरांना सांगितले की, 'मुंबईकरांनो समुद्रात जाणे टाळा. तसंच पाणी भरलेल्या ठिकाणी जाणे टाळा. आपली काळजी घ्या. मदत लागल्यास १९१६ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा', असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. 

...म्हणून आता विक्रम लँडरशी संपर्क होण्याची आस धूसर