पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाच्या १५ रुग्णांची प्रकृती सुधारली, लवकरच डिस्चार्ज : आरोग्यमंत्री

कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर

कोरोना आजार बरा होऊ शकतो. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांपैकी १५ रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोनाबाधितांची प्रकृती सुधारत आहे ही समाधानाची बाब असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी आज जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

बचत खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची अट शिथिल, ATM लाही दिलासा

संचारबंदी दरम्यान वैद्यकीय सेवेवर कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवू नये, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील काही डॉक्टरांनी आपल्या ओपीडी बंद केल्या आहेत. ओपीडी बंद करणे हे योग्य नाही. त्यामुळे आजारी लोकांचे हाल होईल असे सांगत आरोग्यमंत्र्यांनी डॉक्टरांना ओपीडी सुरु ठेवून रुग्णांवर उपचार करा, अशी विनंती केली.

कोरोना: गंभीर यांच्याकडून आर्थिक तर पठाण बंधूंकडून दान-धर्माची मदत

तसंच, आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेला गुडीपाडवा आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत काळजी घेण्याचे आवाहन केले. नवीन वर्षाचे स्वागत करताना 'मी घरी थांबणार कोरोनाला हरवणार' असा संकल्प सर्वांनी करा, असे देखील त्यांनी जनतेला सांगितले. दरम्यान, राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आज कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १०६ वर पोहचला आहे. तर उपाचारा दरम्यान मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:health minister rajesh tope says total 15 corona patients will be discharged tomorrow who have recovered after testing positive